माझे पहिले गुरु

माझे पहिले गुरु - माझे आई- बाबा........

आज आयुष्यात बरेच गुरु आहे, आणि आयुष्याच्या पुढील प्रवासात आणखिन  हि गुरु भेटत राहतील. पण योग्य गुरु निवडण्यासाठी लागणारी विचारशक्ती, सद्सदविवेकबुद्धी ज्यांच्या कडून मला मिळाली ते माझे आई- बाबा. ज्यांनी त्यांच्या संस्कारांनी आम्हाला  घडवले, चागल्या वाईट गोष्टी समजण्याची, समाजात वावरण्याचे योग्य संस्कार आमच्यावर केले.दररोज घडणाऱ्या लहानसहान घटना मधून आम्हाला शिकवले , ज्यातून आम्ही घडत गेलो.

आज ते शरीराने माझ्यापासून दूर असले तरी  विचारांनी ते सतत माझ्या बरोबर असल्याची जाणीव होते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना शतश: प्रणाम....

 "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः।l
 गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।
गुरुपौर्णिमेच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा............


Comments

Popular posts from this blog