माझे पहिले गुरु
माझे पहिले गुरु - माझे आई- बाबा........ आज आयुष्यात बरेच गुरु आहे, आणि आयुष्याच्या पुढील प्रवासात आणखिन हि गुरु भेटत राहतील. पण योग्य गुरु निवडण्यासाठी लागणारी विचारशक्ती, सद्सदविवेकबुद्धी ज्यांच्या कडून मला मिळाली ते माझे आई- बाबा. ज्यांनी त्यांच्या संस्कारांनी आम्हाला घडवले, चागल्या वाईट गोष्टी समजण्याची, समाजात वावरण्याचे योग्य संस्कार आमच्यावर केले.दररोज घडणाऱ्या लहानसहान घटना मधून आम्हाला शिकवले , ज्यातून आम्ही घडत गेलो. आज ते शरीराने माझ्यापासून दूर असले तरी विचारांनी ते सतत माझ्या बरोबर असल्याची जाणीव होते. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना शतश: प्रणाम.... "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः।l गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।। गुरुपौर्णिमेच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा............
Comments
Post a Comment